मराठी कविता संग्रह

काय सांगू सासवांना हासण्याची कारणे (तरीही)

20:10 Sujit Balwadkar 0 Comments Category :

गझल विभागात एक तरही वाचली आणि सहज गंमत म्हणून हे सुचलेलं टाकतोय........
संबंधितांनी कृपया हलके घेणे.
याला काहीच्या काहीच्या काहीच्या काही कविता म्हणण्यासही आक्षेप नाही.

------------------------------------------------------------------------------------

काय सांगू सासवांना हासण्याची कारणे
जाणार गावी आनंदून मग बांधेन मी तोरणे

जीन्स घालता सुनेने बोलती कुजके जरी
मुलीने करता फ्याशन तिला मॉडर्न संबोधणे

देखणे ते नाक मुलीचे अन् सुनेचे ते वाकडे
मुलगी आणि सुनेला का वेगवेगळे जोखणे?

सून करता विचारपूस यांना वाटते "फॉर्म्यालिटी"
मुलीचे टोमणेही भासती मायाळू ते बोलणे

दिवसा ढास खोकल्याची अन् घोरणे रात्री तरी
मधुमेही देहाने उघडूनि फ्रीज गुलाबजाम चोरणे

पावसात ते बहु फिरणे सोसेना सर्दी जरी
ओलेत्या देहानेच मग वातानुकूलित विहरणे

सर्दीने हैराण पण तोंडात केळे कोंबती
ढोल्या देहाला त्या किती ते कुपोसणे )

सोडवा देवा असा थकले करुन धावा बघा
गावी जाती आता जेव्हा मेले हजार मी मरणे

काय सांगू सासवांना हासण्याची कारणे
टळणार ब्याद एकदाची मग बांधेन मी तोरणे

------------------------------------------------------------------------------------
कुपोसणे = कुपोषण या शब्दाचा अपभ्रंश - पोएटिक लायसन्स का काय म्हणतात ते.
------------------------------------------------------------------------------------

- मंदार जोशी

RELATED POSTS

0 अभिप्राय