मराठी कविता संग्रह

एक चोर

22:02 सुजित बालवडकर 2 Comments Category :


एक चोर नदीकाठच्या घरात शिरला रात्री
खूप काही मिळेल त्याला अशीच होती खात्री
रितं रिकामं घर सारं फक्त कोरी पानं
काहींवरती लिहिल्या होत्या कविता काही छान
एक कवी छोटा मोठा रहात होता तिकडे
कवितेसोबत जोडत होता आयुष्याची चित्रे
चोर बिचारा शोधून थकला काहीच नव्हतं घरात
तितक्यात कोठून कवी येउन उभा राहिला दारात
हसुन म्हटला मित्रा रित्या हाती जाउ नकोस
दूरुन आज तु आला असशील निराश होउ नकोस
भेट म्हणुन आता माझे कपडेच घेउन जा
जाण्याआधी सोबत दोन घास खाउन जा
असं म्हणुन त्यानं त्याल कपडेच दिले काढुन
समोर त्याच्या जाउन बसला भाजी-भाकरी वाढून
चोर चकित ! कपडे घेउन धुम्म् गेला पळून
अंधारतून पळतानाही पाहिलं नाही वळून
कवी तसाच नागडा मग खिडकीत येउन बसला
कोजागिरीचा चंद्र पाहून मनात हसुन म्हटला
मला त्याला आनंदाचा मंत्र द्यायचा होता
माझ्या खिडकीमधला आख्खा चंद्र द्यायचा होता


- सौमित्र


Image courtesy: Kishore Kadam (सौमित्र)

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.
अपडेट्स मिळवण्यासाठी हा URL वरील URL bar मध्ये paste करा - http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=wordpress/fQXr

RELATED POSTS

2 अभिप्राय

  1. khupach chan soumitrachya kavita nehmich aagdi shajach pan khup kahi sangun jatat

    ReplyDelete
  2. एक चोर....
    अन एक ...मी....कुठे तरी भेटेल मला तो....म्हणणारा !!!
    अनमोल शब्दांची माळ ........!!!

    ReplyDelete