जीवन त्यांना कळले हो..
जीवन त्यांना कळले हो...
मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो
जळापरी मन निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळले हो
चराचराचे होऊनी जीवन स्नेहासम पाजळले हो
सिंधुसम हृदयात जयांच्या रस सगळे आकळले हो
आपत्काली अन दीनांवर घन होऊनी जे वळले हो
दुरित जयांच्या दर्शनमात्रे मोहित होऊनी जळले हो
पुण्य जयांच्या उजवडाने फुलले अन परिमळले हो
सायासावीन ब्रह्म सनातन घरीच ज्या आढळले हो
उरीच ज्या आढळले हो!
- बा. भ. बोरकर
3 अभिप्राय
प्रिय मित्रा,
ReplyDeleteअनेकानेक धन्यवाद. मी कित्येक दिवसांपासून ही कविता शोधत होतो. मला आज तुमच्याकडून ही भेटली. याबाबतीत मी नवा खेऴाडू, नवा आणि तात्पुरता ! असो ! या कवितेबद्दल शतशः धन्यवाद. आणि हो ! ही कविता संपूर्ण आहे का काही भाग यात राहून गेलाय ? जर संपूर्ण कविता तुमच्याकडे उपलब्ध असेल तर कृपया मला माझ्या इ-मेल वर पाठवा.
- गिरीश
chhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhan
ReplyDeletekhup mast
ReplyDelete