ये थोरवी श्रमासी
हाती धरुन झाडू, तू मार्ग झाडलासी
स्पर्शे तुझ्या महात्म्या, ये थोरवी श्रमासी
तण उच्चनीचतेचे, निपटून काढिले तू
तट धर्मकल्पनांचे, उलथून पाडिले तू
दलितांस धीर दिधला, पुशिलेस आसवांसी
माणूस तोच आहे, नांदोत धर्म लाख
मानव्य हीच आहे, समतेस आणभाक
सेवेस लाविले तू, धनवंतही विलासी
साधारणांत रमसी, असुनी महामती तू
अवरुद्ध धर्मचक्रा, दिधली पुनः गती तू
धागा परंपरांचा, तरीहि न तोडलासी
0 अभिप्राय