असे जगावे - गुरू ठाकूर
आता दोन दिवसांपूर्वी एक प्रसंग झालाय. माझी "असे जगावे" म्हणून एक कविता आहे. एका सोशल नेट्वर्किंग साईट वर, एका मुलीने लिहिले आहे की तिची एक मैत्रीण डिप्रेशनमधे गेली होती आणि सगळ्यांना भीती होती की ती आत्महत्या करणार की काय. पण ही कविता तिच्या वाचनात आली आणि खूप फरक पडला तिच्यात आणि ती डिप्रेशन मधून बाहेर आली. हे वाचून मला खूप आनंद झाला आणि असे अनुभव वाचून मला वाचकांसाठी काहीतरी चांगलं लिहायची प्रेरणा मिळते,
मी माझ्या स्ट्रगलच्या काळात लिहिली होती ती कविता. मुळात मी भयंकर positive आहे . आयुष्य किती दु:खी आहे आणि मी कसा हालात आहे हेच का लिहायचं. माझ्याकडे पैसे नसायचे, स्ट्रगल चालू असायचा, कामं नसायची. तेव्हाही चेह-यावरचा ऊत्साह कायम तसाच असयचा बरेचदा विचारल जायचं की तू इतका स्ट्रगल करूनसुद्धा इतका आनंदी राहूच कसा शकतोस?
उत्तर म्हणून तेव्हा मी चार ओळी लिहिल्या होत्या:
खिशास भोके सत्त्याहत्तर
तरी चेहरा हसरा आहे
माझ्यासाठी जगणे उत्सव
रोज दिवाळी दसरा आहे...
तेव्हा ह्या ओळी जणू माझी आयडेन्टिटी झाल्या होत्या. तसं पहायला गेलं तर ही माझी पहिलीच कविता असं आपण म्हणू शकतो.
5 अभिप्राय
Really Great............!!!!!!!!!!
ReplyDeleteApratim....
ReplyDeletekharach aasech jagawe....kavita apratim aahe
ReplyDeleteshabdamadhunahi jagne shikave, kharach khup chhan aahe hi kavita
ReplyDeleteekach no. jaganyachi ek navi asha nirman karte hi kavita
ReplyDelete