मराठी कविता संग्रह

म्हातारपण

17:35 सुजित बालवडकर 3 Comments Category :

एकदा आले संध्याकाळी सोसाट्याचे वारे
डोक्यावरचे केस उडवून नेले सारे

येत नाही म्हणत, ऐकू कान सोडून गेले
वाक्यामधले अधले मधले शब्द त्याने नेले

चष्मा खराब, डोळे खराब काही कळत नाही
मागचे सारे दिसते स्पष्ट, पुढचे दिसत नाही

जेवण संपवून दंताजींची पंगत उठली सगळी
जून तोंडी पडली नेमकी देखणी गोरी कवळी

कंप कंपनीचा संप करतात बोटे दाही
कापत रहातो पायच नुसता , अंतर कापत नाही

देहसदन सोसायटीचे हल्ली झालेत वांदे
जूने लागे बांधे, तरी आखडून वाकतात खांदे

मन म्हणते, कशाला या अर्थ असतो काही?
मान म्हणते तिन्ही त्रिकाळ नाही नाही नाही

शिवून घेतला सूट नवा , सवलती सकट
सुरकुत्यांचे क्रेप कापड , शिवणावळ फुकट

इतका सारा मेकअप , आता नाटकाला मजा
मुलगे झाले आजोबा अन मुलींच्या आज्ज्या

ओबड धोबड फणसा सारखे पिकत चालले क्षण
आवाज झालाय पावरी सारखा , शेवरी सारखे मन..

एकदा आले संध्याकाळी सोसाट्याचे वारे
डोक्यावरचे केस उडवून नेले सारे

- संदीप खरे

RELATED POSTS

3 अभिप्राय

  1. farach chhan, mhatarpan samjun umajun ghetalya baddal.

    ReplyDelete
  2. Some Corrections

    येत नाही म्हणत, ऐकू कान सोडून गेले
    वाक्यामधले अधले मधले शब्द tyane nele

    कंप कंपनीचा संप करतात बोटे daahi
    कापत रहातो पायच नुसता , अंतर कापत नाही

    देहसदन सोसायटीचे हल्ली झालेत वांदे
    जूने laage baandhe, तरी आखडून वाकतात खांदे

    ReplyDelete