17:56 सुजित बालवडकर 0 Comments Category : बा. भ. बोरकर
नाही पुण्याची मोजणी
नाही पापाची टोचणी
जिणे गंगौघाचे पाणी
कशाचा न लागभाग
कशाचा न पाठलाग
आम्ही हो फुलांचे पराग
आम्हा नाही नाम-रूप
आम्ही आकाश स्वरूप
जसा निळा नळा धूप
पुजेतल्या पानाफुला
मृत्यू सर्वांग सोहळा
धन्य निर्माल्याची कळा
गीत - बा. भ. बोरकर
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
0 अभिप्राय