02:14 सुजित बालवडकर 0 Comments Category : इंद्रजित भालेराव , दिवाळी अंकातल्या कविता , नवकवी
असह्य उकाडा हिदेखील
तुझ्या येण्याचीच खूण
असं कळल्यापासून
त्याचीही प्रतीक्षाच आहे
तू आलास की धुडगुस
विस्कटणं ठरलेलं
तरी प्रतिक्षा संपत नाही
काळीज फाकून फाकून जाते
झाकून दु:ख ठेवू किती
नाती किती तोडून टाकू
दु:खासमोर वाकू किती
- इंद्रजित भालेराव
- सकाळ दिवाळी अंक २०००
0 अभिप्राय