18:41 सुजित बालवडकर 0 Comments Category : सुधीर मोघे
तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो
मी बीज सावल्यांचे पेरीत चाललो
वैराण माळ उघडा बेचैन तळमळे
मी दान आसवांचे फेकीत चाललो
आव्हेरुनी फुलांची अनिवार आर्जवे
काटेकुटे विखारी वेचित चाललो
दाही दिशांत वेडा वैशाख मातला
मी बाण चंदनाचे पेरीत चाललो
ये कोरड्या गळ्यात हा सूर कोठला
मी तार वेदनेची छेडित चाललो
- सुधीर मोघे
0 अभिप्राय